• Tue. Apr 29th, 2025

काँग्रेसची एकूण संपत्ती किती ? भाजपची संपत्ती किती ?

Byjantaadmin

Dec 25, 2023

काँग्रेसनं 19 डिसेंबर रोजी पक्षाच्या 138 व्या स्थापना दिवशी क्राऊड फंडिंगसाठी (Crowdfund) ‘डोनेट फॉर देश’ कॅम्पेनची सुरुवात केली. काँग्रेस पक्षाला  आर्थिक ताकद मिळण्यासाठी या कॅम्पेनची सुरुवात केल्याचं काँग्रेसमधील नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे पक्षाच्या फंडबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेत.. काँग्रेसकडे इतके कमी पैसे आहेत का? की काँग्रेसला कॉप्रोरेट फंड मिळणं बंद झालेय, त्यामुळे क्राऊड फंडिंग कॅम्पेन सुरु केलेय.

असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या आकडेवारीनुसार, राजकीय पक्षांच्या कमाईत भाजप सर्वात पुढे आहे. इतर पक्षांच्या तुलनेत भाजपची कमाई सर्वात जास्त वाढली आहे. तर काँग्रेसच्या कमाईमध्ये 29 टक्के घट झाली आहे. 2014 पासून काँग्रेसच्या कमाईत सातत्याने घट झाली आहे. 2022 मध्ये काँग्रेसची कमाई कमी होऊन 541 कोटी रुपये इतकी झाली.

6 वर्षांत काँग्रेसच्या कमाईत किती घट – 

ADR च्या (असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स) रिपोर्ट्सनुसार, 2014-15 मध्ये राजकीय फंडिंगच्या रुपाने काँग्रेसला 765 कोटी रुपये मिळाले. पण पुढील तीन वर्षांत या कमाईमध्ये सातत्या घट झाली. 2017-18 मध्ये काँग्रेसला फक्त 199 कोटी रुपयांचं फंडिंग मिळालं. 201920 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाला 998 कोटी रुपये फडिंग मिळाले. त्यानंतर पुढील वर्षी काँग्रेसच्या फडिंगमध्ये पुन्हा घट झाली.  2021-22 मध्ये काँग्रेसला पॉलिटिकल फंडिंगद्वारे 541 कोटी रुपये मिळाले.

6 वर्षात भाजपची कमाई किती वाढली ?

ADR च्या (असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स) रिपोर्ट्सनुसार, 2014-15 मध्ये भाजपने पॉलिटिकल फंडिंगद्वारे 970 कोटी रुपयांची कमाई केली होती. 2017-18 मध्ये ही रक्कम वाढून 1027 कोटी रुपये इतकी झाली. 2019-20 लोकसभा निवडणुकीच्या वर्षात भाजपच्या कमाईत तीन पट वाढ झाली. भाजपच्या खात्यामध्ये 3,623 कोटी रुपये जमा होते. 2021-22 मध्ये यामध्ये थोडी घट होऊन 1917 कोटी रुपये झाली. सहा वर्षांतील सरासरी पाहिल्यास भाजपचं पॉलिटिकल फंडिंग दोन पट वाढ झाली.

संपत्तीमध्ये भाजप आघाडीवर – 

ADR च्या (असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स) रिपोर्ट्सनुसार, संपत्तीमध्ये काँग्रेस खूप मागे आहे. 2021-22 च्या डेटानुसार भाजपची संपत्ती सहा हजार कोटींपेक्षा जास्त आहे. तर काँग्रेसची संपत्ती फक्त 805 कोटी रुपये इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed