• Fri. Aug 8th, 2025

अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Byjantaadmin

Nov 26, 2022

अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी वृषाली आणि दोन मुली आहेत. गेल्या 5 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याचे वृत्त होते. मात्र आज सकाळी रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ अपडेटमध्ये त्यांची प्रकृती खालावली होती. मल्टीपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते व्हेंटिलेटवर होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *