राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या जिल्हाध्यक्षपदी ईस्माईल लदाफ
निलंगा, (प्रतिनिधी) : लातुर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या जिल्हाध्यक्षपदी इस्माईल लदाफ यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) येथील शासकिय विश्रामगृहात दि. १८ रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये लातुर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या नुतन जिल्हाध्यक्षपदी इस्माईल लदाफ यांची नियुक्ती करण्यात येवून अल्पसंख्यांक विभागचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब कार्याध्यक्ष मुश्ताकसाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मसुद शेख यांच्या शुभहस्ते इस्माईल लदाफ यांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीबाबतचे नियुक्तीपत्र देऊन लदाफ यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्त्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा शहराध्यक्ष, म्हणून इस्माईल लदाफ यांनी पद भुषवून राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातुन अनेक कामे केली असून, त्यांचे काम पाहून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर देखील निष्ठावंत कार्यकर्त्याच्या यादीमध्ये जिल्हयात इस्माईल लदाफ यांचे नांवे होते. पक्षांमध्ये कितीही मोठे संकट आले असले तरीही शरद पवार यांची त्यांनी साथ सोडली नाही व त्यांच्यासोबत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जिल्हयात काम करत होते, त्यांची हिच पोहंच पावती म्हणून लदाफ यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग लातुर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी विद्यमान जिल्हाध्यक्ष रशिदभाई शेख लातुर मझहर सर नांदेड फारूक भाई जालना तौफिक शेख उस्मानाबाद रहमान खान परभणी प्रदेश महासचिव समीऊल्लाह कादरी व मराठवाडा विभागातील अल्पसंख्याक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इस्माइल लदाफ यांनी येणाऱ्या काळामध्ये अल्पसंख्याक विभागामार्फत संपूर्ण जिल्हयामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी मी सदैव काम करेल व येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे एकनिष्ठपणे काम करुन, जास्तीत जास्त कार्यकर्ते गोळा करुन जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षाचे जाळे निर्माण करणार असल्याचे सांगितले. इस्माईल लदाफ यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे विधानसभा अध्यक्ष सुधीरदादा मसलगे, , जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव, विलास माने, महादेवीताई पाटील, इंजि. विनायक आण्णा बगदुरे, महिला आघाडीच्या, मुनाबी शेख, सौ. वंदना सोळुंके, सौ. कोमल देशपांडे, नंदाबाई पाटील, चंद्रशेखर कत्ते जहांगीर शेख, सलीम पठान नवाज तांबोळी अलीमुद्दीन शेख प्रहलाद पाटील फेरोज जहागीरदार इस्माईल पटेल राजु मोरे विरेश चिंचनसुरे सुधीर साळुंके यशवंत पवार बसवराज रेकुलगे सय्यद फेरोज समीउल्ला कादरी ,ईफरोज शेख, मोहन माने, युवक चे महेश चव्हाण, संदीप मोरे, सिद्दीक मुल्ला अली बाबा चौधरी, मुश्ताक बागबान, विकास ढेरे, बालाजी जोडतल्ले, समद लालटेकडे, मा. सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सुरेश रोळे, बैजनाथ चोपणे. तसेच मित्र परिवार तर्फे फारुख भाई शेख दयानंद चोपणे विलास सुर्यवंशी रोहित बनसोडे अमोल सोनकांबळे तय्यब बागवान मगदूम पटेल जाफर अल्वी सुभानी खान अन्सार शेख व इतर पक्ष संघटनेच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.