लातूर, : तुळजापूर औसा महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघांपैकी तिघेजण जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला होता.याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील तुळजापूर औसा महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि कारची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचं इंजिन बाजूला निघून पडलं होतं. कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.गाडीतून मृतदेह बाहेर काढून ते औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे बाबा पठान, जीएम बिराजदार, रणदिवे आणि राजू बागवान अशी असल्याचं समजते. ट्रॅक्टर चालकाबाबत माहिती समजू शकली नाही. या अपघाताची नोंद पोलीसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
लातूरमध्ये तुळजापूर औसा महामार्गावर मध्यरात्री कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्यांपैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. महेबूब मुन्नवरखान पठाण, जयप्रकाश मोतीराम बिराजदार, संजय बाबुराव रणदिवे तर चालक राजेसाब नन्हु बागवान अशी अपघामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
औसा तालुक्यातील शिवलीहून औसाकडे येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. शुक्रवारी मध्यरात्री 12:50 वाजता औसाजवळील साईप्रसाद हॉटेलसमोर हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गाडीतून मृतदेह बाहेर काढून ते औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. लातूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.