• Thu. May 1st, 2025

लैंगिक छळाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंहांनी ‘पडद्यामागून’ कुस्ती जिंकली; साक्षी मलिक आणि विनेश फोगाटचा कुस्तीला ‘रामराम’

Byjantaadmin

Dec 21, 2023

कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. साक्षी मलिक आणि विनेश फोगट (Sakshi Malik and Vinesh Phogat) यांनी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत भावूक दिसलेली ज्येष्ठ कुस्तीपटू साक्षी म्हणाली की, महासंघाविरुद्धच्या लढाईला बरीच वर्षे लागली. आज जो प्रमुख झाला आहे तो त्यांना (बृजभूषण सिंह) मुलापेक्षाही प्रिय आहे किंवा त्यांचा राईट हँड  म्हणू शकता. एकाही महिलेला सहभाग दिला नाही. मी माझी कुस्ती सोडून देत आहे. यानंतर पत्रकार परिषदेतून बाहेर पडताना साक्षीन तिचे कुस्ती शूज टेबलवर सोडून गेली.

 

 

काय म्हणाला बजरंग पुनिया?

बजरंग पुनिया म्हणाला की, आमचा लढा पूर्वी सरकारशी नव्हता आणि आजही नाही. त्याची शक्ती आणि त्यामागे कार्यरत यंत्रणा साऱ्या देशाने पाहिली. 20 मुली आल्या होत्या आणि त्यांनी त्यांची निवड केली. ही लढाई सर्वांनाच लढावी लागणार आहे. आम्ही कधी कुस्ती करू शकू असे वाटत नाही. आमच्यासाठी जातिवाद नाही, पण आम्ही जातिवाद पाळतो असे ते सांगत आहेत. आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर आमच्या बहिणी आणि मुलींसाठी लढण्यासाठी आलो आहोत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *