निलंगा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजित नाईकवाडे यांचा अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार
निलंगा-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी अजित नाईकवाडे यांची निवड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या नियुक्तीपत्राद्वारे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक श्रीहरी रुपवनर यांच्या हस्ते देण्यात आले. यानंतर निलंगा तालुका काँग्रेस कार्यालयमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून निलंगा नगरपरिषदेच्या माध्यमातून स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी अनेक विकासाची कामे केली.पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला वैभव प्राप्त करण्यासाठी शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक प्रभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजूट करण्यासाठी व लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून शहरातून मताधिक्य मिळवण्यासाठी कामाला लागावे असे ते म्हणाले. यावेळी अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,निलंगा अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष लाला पटेल,माजी नगरसेवक सिराज देशमुख, अशोक शेटकार,डीसीसीचे निवृत्त अधिकारी व्यंकटराव शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद ढेरे,हलगऱ्याचे मंगेश चव्हाण,बेंडगाचे गोविंद धुमाळ, संतोष धानोरे, यासीन मणियार, शकील शेख, समद टेलर, निलंगा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर, सोहेल शेख,सहदेव भोसले, भागवत बिराजदार,अमोल दूधभाते,जिल्हा काँग्रेसचेसेलचे कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी व इतर कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.