वादळ विसावलं.
लातुर:-ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड. मनोहररावजी गोमारे साहेब यांचे आज सकाळी निधन झाले. ही वार्ता अत्यंत दुखःद आहे.
मागील तीन चार दिवसांपासून हृदयरोग त्रासामुळे लातूर येथील कवठाळे हॉस्पिटल येथे त्यांचावर उपचार सुरू होते, परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने लातूर शहराची कधीही न भरून निघणारी सामाजिक हानी झाली आहे.
एक संघर्षशील नेतृत्व, कर्मठ विधीज्ञ, समाजवादी विचारसरणी जपणारे तत्वनिष्ठ राजकारणी असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असणारे श्री गोमारे साहेब यांच्या पार्थिवावर आज दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील.