• Mon. Aug 11th, 2025

शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम रक्कम तात्काळ द्यावा- युवासेना

Byjantaadmin

Dec 19, 2023
शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम रक्कम तात्काळ द्यावा- युवासेना
 निलंगा -शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम रक्कम तात्काळ द्यावा व विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद शेतकरीऱ्याबद्दल शासनाने घेतलेला मुद्दल व व्याज भरणे संबंधीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने माननीय जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना देऊन दोन महिने झाले अद्यापपर्यंत 50% शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यात आलेली नाही ती तात्काळ देण्यात यावी तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मिळते ,आजपर्यंतच्या काळात शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज बँकेच्या माध्यमातून मुद्दल भरली जाते व व्याज फक्त शेतकरीच भरतात पण आताच्या शासनाने मुद्दल तसेच व्याज भरणा तात्काळ करावा असा आदेश काढला आहे.  तो आदेश तात्काळ  रद्द करून फक्त शेतकऱ्याकडून व्याज भरून घेण्यात यावे.  ए. पी. एल धारक शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून राशन गेले एक वर्षापासून शासनाने बंद केले आहे व त्याबद्दल पैशाच्या स्वरूपात रक्कम दिली जाईल असा जीआर काढला पण आजतागायत  शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत.   पैशा ऐवजी शेतकऱ्यांना राशन देण्यात यावे.
         शासनाने लातूर जिल्हा हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केला असून त्याच शासनाने शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून घेतलेले कर्ज मुद्दलासहित व्याज भरावे असा आदेश काढला आहे. दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्याकडे व्याज भरण्यासाठी पैसे नाहीत, शेतकरी मुद्दल कसा भरेल हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा टाकला आहे. शासनाने हा निर्णय तात्काळ रद्द करून फक्त व्याज भरून घ्यावे नाहीतर शेतकरी हातात रुमणे घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल शासनाने घेतलेला हा  निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा शेतकऱ्यांबरोबर शिवसेना व युवासेना रस्त्यावर उतरेल असे वक्तव्य युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना मागणी केली आहे. निवेदनावर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मुस्तफा शेख,महिला आघाडी शहरप्रमुख दैवता सगर, राजपाल पाटील, बालाजी नारायणपुरे, शंकर डोके, एकबाल पटेल, महिलाआघाडीच्या माजी तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, पार्वती कांबळे,मारुती बिराजदार व्यंकट इंचूरे, नामदेव शिरसले इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *