ओबीसी चिंतन बैठकीत राजकीय नेत्यांचा निषेध
निलंगा :-शासकीय विश्राम गृह येथे सर्व ओबीसी प्रवर्ग समाज बांधवा ची चिंतन बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये सध्या चालू असलेल्या ओबीसी व मराठा आरक्षणाच्या घडामोडींवर चर्चा करण्यात आली. ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करण्यात आला. मनोज जारांगे यांच्या मराठ्यांना ओबीसी मधून अरक्षण देण्याच्या मागणीचा विरोध करण्यात आला. सर्वच राजकिय पक्षांची ओबीसी चा आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्याची भूमिका असताना निलंगा येथील निलंगा विधान सभेचे इच्छुक सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांची मनोज जरांगे यांच्या निलंगा येथील कार्यक्रमास निधी देण्याची व सक्रीय सहभाग घेण्याची चढाओड लागली होती. त्या मध्ये या नेत्यांनी निधी ही दिला व सक्रीय सहभाग पण घेतला. याचाच अर्थ या नेतेमंडळींना ओबीसी आरक्षणचा व ओबीसी मतदाराच्या भावनेचा अनादर केला आहे. त्या मुळे या नेत्या विरोधात पक्ष श्रेष्ठी कडे तक्रार करण्याचा व या नेत्यांविरोधात ओबीसी बठकीत निषेध नोंद करण्याचा प्रस्ताव ओबीसी नेते अजित निंबाळकर यांनी ठेवला व तो सर्व संमतीने पारित करण्यात आला. येणाऱ्या काळात सर्व ओबीसी बांधवांनी एकजूट होऊन या नेत्यांना घरी बसवून ओबीसीनची एकजूट करुन ओबीसी ची ताकत दाखवण्याची वेळ आली असल्याचे सर्व ओबीसी बांधवांनी आपली भावणा ओबीसी चिंतन बठकीत मांडली . या बैठकीस अजित निंबाळकर, विलास माने, दयानंद चोपणे, मोहन क्षीरसागर , विलास सूर्यवंशी, मंजुषा निंबाळकर, झतिंग मेहत्रे,शरद पेठकर, इस्माईल लदाफ व इतर ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.