जगातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये सौ. दीपशिखा धिरज देशमुख
लातूर : जगभरात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या ‘परफेक्ट वुमन मॅगझिन’ ने जगभरातील १०० प्रभावशाली महिलांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून त्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या सुनबाई, लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या सुविद्य पत्नी, ‘रीड लातूर’ उपक्रमाच्या प्रमुख आणि चित्रपट निर्मात्या दीपशिखा देशमुख यांचा समावेश असून त्यांना शंभरच्या क्रमवारीत नव्या स्थानी मान मिळाला आहे. ‘परफेक्ट वुमन मॅगझिन’ ने विविध कार्यकृर्तत्वाच्या निकषावर नुकताच एक जागतिक सर्वे करून जगभरातील शंभर प्रभावशाली महिलांची यादी छायाचित्र आणि त्यांच्या कार्यासह प्रसिद्ध केली आहे. या यादीत सीमा रामदास आठवले, निता अंबानी, अमृता देवेंद्र फडणवीस, डॉ. मधू चोप्रा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अभिनेत्री दीपिका पादुकोण, कंगना राणावत, प्रियांका चोप्रा यांचा अनुक्रमे एक ते आठ क्रमांक असून नवव्या स्थानावर दीपशिखा देशमुख दहाव्या क्रमांकावर ऐश्वर्या राय-बच्चन यांचे स्थान आहे.