लातुर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
नागपुर:-लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख तसेच माथाडी कामगार सेनेचे राज्य चिटणीस शिवाजीराव माने यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपुर येथील ‘रामगिरी’ या निवासस्थानी उपस्थित राहून शिंदे गट शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पक्षप्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, महाराष्ट्र कामगार सेनेचे राज्य चिटणीस व्यंकटराव खंडेराव बिराजदार, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, लातूर ग्रामीणचे तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, निलंगा माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील ,शिवाजी पांढरे, युवराज वंजारे, महिला आघाडी संघटीका सौ.सविताताई पांढरे, सौ.अरुणाताई माने यांच्यासह औसा, निलंगा, देवणी, शिरूर, आनंदपाळ आणि एसटी कामगार सेनेचे असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी राज्यातील सरकार हे सर्व घटकांना न्याय देणारे सरकार असून, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आणि त्यांना अभिप्रेत असलेले काम करणारे सरकार आहे. ज्या भागात आपण काम करता तिथे पक्ष बळकट करण्यासाठी काम करावे. आपण माझ्यावर जो विश्वास दाखवलात तो नक्कीच सार्थ ठरेल आणि तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव संजय मोरे ,सुधीर पाटील उपस्थित होते.