कौशल्य, नम्रता असेल तर यश मिळतेच – डॉ. सर्जेराव शिंदे
कॉक्सिटमध्ये विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण
लातूर ः तुम्ही पदवी प्रदान केली, त्यासोबत स्वतःमध्ये कौशल्य किती विकसित करून घेतली आहेत, नम्रता किती आहे, यावर तुमचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यपीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी व्यक्त केला.
येथील कॉक्सिट महाविद्यालयातील पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी वितरण समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रॉयल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष एल. एम. पाटील, संस्थेचे तज्ज्ञ संचालक एन. डी. जगताप, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव,परीक्षा विभाग प्रमुख प्रा. आय. ए. पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ. शिंदे म्हणाले, संस्थाध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे अतिशय कमी कालावधीत कॉक्सिटने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केला आहे. आज आयटीसह कोणत्याही क्षेत्रात कॉक्सिटच्या विद्यार्थ्यांविषयी बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणच्या आयटी कंपन्या येथील विद्यार्थ्यांसाठी आतूर आहेत. हे सांघिक मेहनतीमुळे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यासोबतच त्यांच्या अंगी कौशल्य व नम्रता हे गुण कॉक्सिटने विद्यार्थ्यांना दिल्यामुळे येथील विद्यार्थी सरस ठरत आहेत, याबळावरच भविष्यातही तुम्ही यशस्वी व्हाल, असा आशावाद डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
कॉक्सिटमध्ये विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण
