विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वंचित नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा– खासदार सुधाकर शृंगारे
लातूर, (जिमाका) : केंद्र शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. ज्या पात्र नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही, त्यांची या माध्यमातून नोंदणीही केली जात आहे. या यात्रेचा लाभ घेत वंचित नागरिकांनी शासकीय योजनांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले.
लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सोनानगर येथे रविवारी विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार श्री. शृंगारे बोलत होते देविदास काळे, ॲड. गणेश गोमचाळे, अमोल गिते, बालाजी मारखडे, दुर्गेश चव्हाण, डॉ .बोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, उज्ज्वला योजना, आधारकार्ड तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली. सर्व पात्र नागरिकांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन खा. शृंगारे यांनी यावेळी केले.लातूर शहर महानगरपालिकेच्यावतीने शहराच्या विविध भागात यात्रेचे नियोजन करण्यात आले असून त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोनानगर येथे परिसरातील जवळपास 500 नागरिकांची उपस्थिती होती.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत सोमवारी विविध गावांमध्ये शासकीय योजनांची दिली जाणार माहिती
लातूर, दि. 10 (जिमाका) : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत सोमवार, 11 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात आहे. तरी संबंधित गावातील नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचेआवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
11 डिसेंबर,2023 रोजी अहमदपूर तालुक्यात सकाळी आनंदवाडी, दुपारी सय्येदपूर खु., औसा तालुक्यात सकाळी एरंडी, दुपारी आलमला, चाकूर तालुक्यात सकाळी अजन्सोंडा, दुपारी जानवळ, देवणी तालुक्यात सकाळी हंचनाळ, दुपारी वागदरी, जळकोट तालुक्यात मंगरुळ, दुपारी बोरगांव खु., लातूर तालुक्यात सकाळी शिवणी खु, दुपारी सेलू बु., निलंगा तालुक्यात सकाळी मिरगणहळही व कलांडी, दुपारी देवीहल्लाळी व बसपूर, रेणापूर तालुक्यात सकाळी कोळगाव, दुपारी निवाडा, शिरुर अनंतपाळ तालुक्यात सकाळी वांजरखेडा, दुपारी हिसामाबाद, उदगीर तालुक्यात सकाळी तिवटग्याळ, दुपारी हैबतपूर येथे विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.