आलमला ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार
लातूर द औसा तालुक्यातील आलमला येथील ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनल प्रमुख नरेंद्र पाटील,अँड उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलमला येथील सरपंच व 7 ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेल्या पॅनल प्रमुख नरेंद्र पाटील व अँड उमेश पाटील ,नूतन सरपंच विकास वाघमारे ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारी आशियाना बंगल्यावर राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांची भेट घेतली यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते पॅनल प्रमुख व नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . यावेळी नूतन आलमला येथील सरपंच विकास वाघमारे,ग्रामपंचायत सदस्य इरफान मुलाणी, शिवकुमार पाटील, कीर्ती निलंगेकर, हरिबाई चित्ते, अमर लांडगे, रत्नमाला लोणारे, प्रेमला कदम, मोहिनी गुरव अँड संगमेश्वर पाटील, बसवेश्वर धाराशिवे, महेश खिचडे, विरणाथ अंबुलगे यांच्यासह आलमला येथील ग्रामस्थ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते