महाराष्ट्रची कु. सपना पांचाळ इतिहास विषयातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम
निलंगा- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी २०२३ परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सपना पांचाळ हिने ‘इतिहास’ या विषयात सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आणि डॉ. अनिल कठारे यांनी पुरस्कृत केलेल्या श्री. मुरलीधर एकनाथ कठारे सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजयकुमार शिवाजीराव पाटील निलंगेकर,सचिव मा. बब्रुवानजी सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधवराव कोलपूके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाबद्दल विद्यापीठ परिसरात तिचे कौतुक होत आहे.