जिवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेचा कपडा बँक उपक्रमातून कपडे वाटप
निलंगा:-कपडा बँक उपक्रमा अंतर्गत निलंगा शहरातील व तालुक्यातील नागरिकांना आवाहन करुन कपडे जमा करण्यात आले होते.
त्यानुसार युथ फॅशन महाराष्ट्र शिक्षण समिती कॉम्प्लेक्स महेश जाधव,पुजारी टी हाऊस अँड हॉटेल बँक कॉलनी अविनाश पुजारी, जिजाऊ कॉफी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक कोरे शिवाजी,हॉटेल टॉप वन अटल वाक् गार्डन च्या समोर करण सोळुंके , व्यंकटेश ज्वेलर्स सराफ लाईन सागर नाईक, स्वागत जनरल स्टोअर्स छत्रपती शिवाजी महाराज चौक निसार तांबोळी या ठिकाणी कपडे जमा झाले होते.ते कपडे वैदू वस्ती, पाशी पारर्धी वस्ती, फकीर वस्ती, मरीआई वस्ती या ठिकाणी संस्थेचे पदाधिकारी पत्रकार गुरूनाथ महालींगाप्पा मोहोळकर , डॉ सतीश जाधव, परमेश्र्वर नागनाथ पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मल्लिनाथ मोहोळकर,सोमनाथ मोहोळकर,हरिभाऊ टोंपे,परमेश्वर पाटील,कार्तिक स्वामी,पाटील विठ्ठल, राजे गहिनीनाथ, गणेश मोहोळकर यांचे सहकार्य लाभले. संस्थेच्या माध्यमातून गरीब वस्तीवर कपडा बँक, माणुसकीची भिंत या उपक्रमातून कपडे वाटप, करणे, पक्ष्यांना पाणपोई झाडांना बांधणे वाटप , कोरोना काळात कार्य केलेल्या कोरोणा योध्यांचा सत्कार, मोफत योग प्राणायाम, मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षण शिबिर , वृक्षारोपण, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथि , वाईट व्यसनाची, दुर्गुनाची होळी, कोरोना काळात जनजागृती अभियान आणि जनजागृती पर माहितीची पत्रके वाटप, नैसर्गिक आपत्तीत मदत करणे इत्यादी अनेक उपक्रम राबविले जातात.