• Tue. Apr 29th, 2025

‘गगन सदन तेजोमय’ दिवाळी पहाटचे ‘ध्यास सन्मान’ जाहीर

Byjantaadmin

Nov 6, 2023

‘गगन सदन तेजोमय’ दिवाळी पहाटचे ‘ध्यास सन्मान’ जाहीर

रविवार १२ नोव्हेंबर, सकाळी ७ वाजता, शिवाजी पार्क, दादर येथील स्वा. सावरकर सभागृहात भव्य सोहळा!*

 

मुंबई – ‘गगन सदन तेजोमय’ ही पहिली दिवाळी पहाट शिवाजी पार्कवर, १९ वर्षांपूर्वी  सादर झाली. उत्तरोत्तर दिवाळी पहाटचे कार्यक्रम रंगले. त्याला जोड होती समाजऋणाची. कृतज्ञतेची. सामाजिक भान राखत जीवन वेचणार्‍या समाजव्रती व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्याबद्दल, एका ध्यासाने जीवन जगणाऱ्या आणि समाजाला समृद्ध करणार्‍या कलाकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा’ध्यास सन्मान’ गेली अठरावर्षं  प्रदान करण्यात आला आहे. यात श्रीनिवास खळे, ज्येष्ठ पत्रकार निळू दामले, डॉ. रवी बापट, शेखर देशमुख – पत्रकारिता, मंगेश पाडगावकर, ज्योती पाटील, श्रीमती रेखा मिश्रा – रेल्वे पोलीस दल, अविनाश गोडबोले, ओमप्रकाश चव्हाण अशा व्यक्ती आणि भटक्या विमुक्त जमातीसाठी काम करणारे गिरीश प्रभुणे,  राजाराम आनंदरावभापकर (भापकर गुरुजी), पुणे, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान – सोलापूर, श्री पवनपुत्र व्यायाम मंदिर, प्रगती अंध विद्यालय बदलापूर, जन-आधार सेवाभावी संस्था लातूर,  भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान कुडाळ, संपूर्ण बांबू केंद्र) – मेळघाट, निवांत अंधमुक्त विकासालय संस्था -पुणे, रविकिरण मंडळ – मुंबई, माँ अन्नपूर्णा सेवा समिती – अकोला, संवेदना सेरेड्रल पालसी विकसन केंद्र,अहिल्या महिला मंडळ – पेण, डॉ.  अनंत पंढरे – हेगडेवार रुग्णालय – औरंगाबाद, जीवन ज्योती ट्रस्ट – मुंबई, लक्ष्य फाउंडेशन – पुणे, मातृछाया ट्रस्ट – गोवा, ‘सावली’ – अहमदनगर, वालावलकर रुग्णलय – डेरवण, वनवासी कल्याण केंद्र, तलासरी, सुहित जीवन केंद्र – पेण, नाना पालकर स्मृती समिति, अनिता मळगे, मा. मधुकर पवार, दत्तात्रय वारे – जत, सुहासिनी माने – फलटण अशा संस्था यांचा समावेश आहे. असा गौरव करणारी ही एकमेव दिवाळी पहाट आहे, असे विनोद पवारसांगतात.

 

यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव या प्राथमिक शाळेचा एक आदिवासी शाळकरी विद्यार्थी आर्यन भांगरे याचा तसेच संस्था म्हणून विद्यार्थीउत्कर्ष मंडळ, चिंचपोकळी व नाट्यपराग संस्था, घाटकोपर यांचा गौरव ‘ध्यास सन्मान’ प्रदान करून केला जाणार असल्याचे महेंद्र पवार यांनी कळवले आहे. त्यासोबत दीपिका भिडे – भागवत सादर करणार आहेत भक्तिगीते.त्याचे निरुपण डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांचे आहे. ‘आनंदाचा कंद’ असे शीर्षक असलेल्या या कार्यक्रमाचे निवेदन प्रमोद पवार करतील. विनोद पवार आणि महेंद्र पवारयांची संकल्पना, संयोजन असलेलीही दिवाळी पहाट रविवार, १२ नोव्हेंबर २०२३रोजी, सकाळी ७ वाजता, शिवाजी पार्क, दादर येथील स्वा. सावरकर सभागृहात संपन्न होणार आहे.

‘गगन सदन तेजोमय’

आनंदाचा कंद

भावभक्तीत भिजलेली, शब्दसुरात रंगलेली, कृतज्ञतेने गहिवरलेली….मंगल प्रभात!

ॲड फिझ प्रस्तुत दिवाळी पहाट – वर्ष १९ वे

संकल्पना :  विनोद पवार

संयोजन -सुत्रधार : महेंद्र पवारगायिका: दीपिका भिडे भागवत

तबला : यती भागवत

हार्मोनियम : अनंत जोशी

पखवाज : हनुमंत रावडे

साईड रिदम : श्वेत देवरूखकर

कोरस : गौरी रिसबूड, शर्वरी पेंडसे

निरूपण : डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी

निवेदन : प्रमोद पवार

निवेदन संहिता : अरूण जोशी

जुगलबंदी : विजय चव्हाण – आर्यन भांगरे

कला : गोपी कुकडे

कला सहाय्य : समीर अन्नारकर

नेपथ्य : अजित दांडेकर

ध्वनी : विराज भोसले

प्रकाश : शीतल तळपदे

प्रसिद्धी प्रमुख : राम कोंडीलकर

ऋणनिर्देश

श्री. विनायक गवांदे

डॉ. माधुरी गवांदे

श्री. प्रशांत (राजू) जोशी-चिपळूण

डॉ. नीना सावंत

अॅड. संजीव सावंत

श्री. सुजय पतकी

श्री. सुदेश हिंगलासपूरकर

डॉ. अविनाश फडके

श्री. श्रीराम दांडेकर

ध्यास सन्मान :

विध्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई

नाट्यपराग – पराग प्रतिष्ठान,मुबंई

आर्यन भांगरे, देवगाव-ता. अकोला.

रविवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२३

सकाळी ७ वाजता

स्थळ : वीर सावरकर स्मारक सभागृह,

शिवाजी पार्क, दादर, मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed