• Tue. Apr 29th, 2025

दानशूर महिला कोण? वर्षभरात दिली तब्बल 170 कोटींची देणगी

Byjantaadmin

Nov 5, 2023

जगात बिल गेट्सपासून वॉरन बफेपर्यंत अनेक अब्जाधीश आहेत. हे लोक दरवर्षी मोठ्या प्रमाणात देणगी देतात. भारतातही देणगीदारांची कमतरता नाही, इथेही श्रीमंत धनदांडगेही देणगी देण्यात मागे नाहीत. एचसीएलचे प्रमुख शिव नाडर, विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी ते रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांसारखी मोठी नावे यात सामील आहेत. जे आपली कमाई शिक्षण, आरोग्य यासह अनेक क्षेत्रात खुलेपणाने दान करतात. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात मोठी देणगी देणारी महिला कोण आहे? चला तर जाणून घेऊयात त्या दाणशूर व्यक्तीबद्दल माहिती.

रोहिणी नीलेकणी ही सर्वात मोठी दानशूर महिला

रोहिणी नीलेकणी ही सर्वात मोठी दानशूर महिला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या एडलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्टनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वाधिक देणगी देणारी भारतीय महिला म्हणजे रोहिणी नीलेकणी. जी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या पत्नी आहेत. आपल्या पतीप्रमाणेच रोहिणी देखील सामाजिक कार्यात परोपकारी कार्यात आघाडीवर आहेत. त्यांनी इतर देणगी देणाऱ्या महिलांना मागे टाकत सर्वात मोठ्या दानशूर महिलेचा किताब पटकावला आहे. EdelGive Hurun India Philanthropy List 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, रोहिणी नीलेकणी यांनी मोठी रक्कम दान केली आहे.

रोहिणी नीलेकणी यांनी वर्षभरात 170 कोटी रुपयांची देणगी

रोहिणी नीलेकणी यांनी वर्षभरात 170 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. हुरुनच्या अलीकडील भारतीय देणगीदारांच्या यादीत समाविष्ट असलेल्या महिलांबद्दल बोलायचे तर रोहिणी नीलेकणी पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 170 कोटी रुपयांची मोठी देणगी दिली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची देणगी देऊन एकीकडे रोहिणी महिला रक्तदात्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतानाच दुसरीकडे तिला देशातील 10 श्रीमंत देणगीदारांच्या यादीतही स्थान मिळाले आहे. रोहिणी व्यतिरिक्त, उदारपणे देणगी देणाऱ्या महिलांमध्ये अनु आगा आणि थरमॅक्सचे कुटुंब (रु. 23 कोटी), USV च्या लीना गांधी तिवारी (रु. 23 कोटी) यांचा समावेश आहे.

शिव नाडर देणगी देण्यात आघाडीवर 

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, EdelGive Hurun India Philanthropy List 2023 नुसार, शिव नाडर 2042 कोटी रुपयांची देणगी देऊन देशातील सर्वात परोपकारी बनले आहेत. 2022-23 आर्थिक वर्षात त्यांनी दररोज सरासरी 5.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. शिव नाडर यांच्यानंतर विप्रोचे अझीम प्रेमजी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 2022-23 मध्ये एकूण 1774 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जे 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 267 टक्के अधिक आहे. तर मुकेश अंबानी देणगीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed