महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमन लॉयर्सच्या अध्यक्षपदी अॅड. जयश्रीताई पाटील
लातूर : लातूरच्या ज्येष्ठ महिला विधिज्ञ अॅड. जयश्रीताई संभाजीराव पाटील यांची महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमन लॉयर्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांनी नुकताच अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.
महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्सच्या महिला वकील परिषदेची स्थापना पुण्यात दि. ८ मार्च २००८ या जागतिक महिला दिनी करण्यात आली आहे. परिषदेच्या स्थापनेपासून संघटनेचे अध्यक्षपद मुंबई, पुणे, नाशिकच्या महिला वकिलांकडे होते. ऑक्टोबरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये अॅड. जयश्रीताई पाटील यांच्या रूपाने ही जबाबदारी प्रथमच लातूर – मराठवाड्याकडे आली आहे. अॅड. जयश्रीताई पाटील यांनी नुकताच या पदाचा पदभार महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वूमेन लॉयर्सच्या (एमएफडब्ल्यूएल ) च्या पहिल्या अध्यक्षा अॅड. साधना शहा , माजी अध्यक्षा अॅड. जयश्री अकोलकर,अॅड. निलिमा वर्तक, उपाध्यक्षा अॅड. वैशाली खाडे , अॅड. सुजाता तांबे, सचिव अॅड. राजकुमारी राय, सहसचिव अॅड. सीमा बिठाने, कोषाध्यक्षा अॅड. विद्या पेलपकर , लातूरच्या सहकारी अॅड. अरुणा वाघमारे यांच्या उपस्थितीत स्विकारला .
या निवडणुकीसाठी अॅड. जयश्रीताई पाटील यांना एमएफडब्ल्यूएल च्या लातूर येथील सदस्या व पदाधिकारी अॅड. सुनंदा इंगळे, अॅड. किरण चिंते, अॅड. सुरेखा जानते , अॅड. पद्मा परमा, अॅड. लता बदने, अॅड. बबिता संकाये, अॅड. रानू रकटे , अॅड. कल्पना भूरे ,अॅड. सुमेधा शिंदे, अॅड. देवताळकर, अॅड. चारुशिला पाटील, यांनी सहकार्य केले. एमएफडब्ल्यूएल ही संघटना महिला विधिज्ञांसह महिला, लहान मुले यांच्याकरिता राज्यात कर करते. या संघटनेचे प्रदेशाध्यक्षपद अॅड. जयश्रीताई पाटील यांच्याकडे आल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.