• Wed. Apr 30th, 2025

गुणरत्न सदावर्ते कोणाचा माणूस आहे? देवेंद्र फडणवीयांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले…

Byjantaadmin

Oct 29, 2023

राज्यात मराठा आरक्षण विरोधात बोलणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाजात संतप्त भावना आहे. परवा त्यांच्या गाडीवर हल्ला देखील झाला होता. या नंतरही गुणरत्न सदावर्ते यांनी टीका करणे सुरूच ठेवले आहे. दरम्यान हे गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असल्याची टीका सातत्याने होत असते. यावरून फडणवीसांना अनेकदा लक्ष देखील करण्यात आहे. या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझा गुणरत्न सदावर्तेंशी काही संबंध नाही. ते काही बोलतात त्याचे समर्थन मी कधीच करत नाही. मी स्पष्टपणे सांगतो की, ते जे काही बोलतात त्याला माझं अजिबात समर्थन करत नाही. सदावर्ते कुणाचा माणस आहे हे मला माहिती नाही. त्यांचा कोण वापर करतंय की, ते स्वतः बोलत आहेत ते मला माहिती नाही., देवेंद्र फडणवीस “मी ब्राह्मण असल्याने मला लक्ष केले जात आहे. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी राजकारण केलं असे काही जण मला लक्ष्य करत आहे. जो पर्यंत मी मुख्यमंत्री होतो तो पर्यंत हे आरक्षण कोर्टात टिकले माझ्या नंतर हे आरक्षण कोर्टात टिकले नाही. याबाबत काय आणि कसं घडलं ते सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा एखाद्याला श्रेय देता येत नाही तेव्हा त्याचं श्रेय काढून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मनोज जरांगे पाटील यांनाही अशाच कुणीतरी हे सांगितलं असावं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *