पूर्वी विवाहित असल्याची माहिती लपवून किंवा एखाद्या महिलेशी विवाह करणे किंवा संबंध प्रस्थापित करणे, तसेच आपली खरी ओळख लपवून नाती जोडणे हा भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा ठरणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार अशी कृती करणे फसवणूक मानण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. विधीविषयक संसदीय समितीने या संदर्भात अहवाल तयार केला असून, याबाबत विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे. यानुसार जर एखाद्या व्यक्तीने लग्न करण्यासाठी आपली ओळख लपवली किंवा संबंध प्रस्थापित करण्यासाठी तसे केले तर तो बलात्कार मानला जाणार नाही, तर तो शोषण आणि फसवणूक मानली जाणार आहे.अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्याची तयारी करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. लग्नाचे आश्वासन देताना ओळख लपवून कोणाशी लग्न करणे ही फसवणूक समजली जाईल, असे या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.भारतीय न्यायिक संहिता विधेयकावरील स्थायी समितीचा मसुदा अहवाल शुक्रवारी सादर करण्यात येणार आहे. खरंतर गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये लोकांनी पूर्वी विवाह झाल्याचे लपवून नव्याने विवाह केले. यानंतर महिला फसवणुकीच्या घटना समोर आले होते.याशिवायDHARM लपवून लग्न केल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. या कायद्यामुळे आता असं पहिल्यांदाच होणार आहे की, लग्न करताना स्वत:ची ओळख लपवणे हा गुन्हा मानून स्वतंत्रपणे खटला चालवला जाणार आहे. अशा प्रकरणांना सामोरे कसे जायचे, असा पेच होता. आता यावर कायदा करून अशा प्रकरणांमध्ये कारवाई कशी असावी, याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.