• Sun. Jun 15th, 2025

हिवाळी अधिवेशन कालावधीत ‘कास्ट्राईब’चे धरणे आंदोलन

Byjantaadmin

Oct 27, 2023

हिवाळी अधिवेशन कालावधीत ‘कास्ट्राईब’चे धरणे आंदोलन

महासंघाच्या नागपुरातील अधिवेशनात राज्यातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

लातूर,  :  शासनाने कंत्राटी भरती करू नये. जुनी पेन्शन योजना तत्काळ प्रभावासह लागू करावी. रिक्त पदे तत्काळ भरावीत. पदोन्न्तीत विनाविलंब आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशन कालावधीत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी शासनाला दिला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे, असेही ते म्हणाले. या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करू, असे मत महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी मांडले.

महासंघाचे 43 वे अधिवेशन नागपूरच्या जवाहर विद्यार्थीगृहात पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन माजी मंत्री नितीन राऊत यांच्याहस्ते झाले. माजी जिल्हाधिकारी वसंतराव खोब्रागडे, एसआरपीएफ समादेशक प्रियंका नारनवरे, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, माजी अप्पर आयुक्त सुधीर मेश्राम, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, उपाध्यक्ष प्रभाकर सोनडवले, राजकुमार घोडेस्वार, राज्य शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष बी.डी.धुरंदर,  वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ उपस्थित होते. महासंघाचे छत्रपती संभाजी नगरचे विभागीय अध्यक्ष मनोज कांबळे, लातूर जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, सरचिटणीस अशोक माळगे, कार्याध्यक्ष गणेश राठोड, कोषाध्यक्ष प्रशांत म्हेत्रे, संघटक नागरत्न कांबळे, शिक्षक संघटनेचे राहुल गायकवाड, सुभाष मस्के प्रसिध्दीप्रमुख बालाजी केंद्रे यांच्यासह महाराष्ट्रातील महासंघाचे विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महत्वपूर्ण काम करत आहे. सर्व सामान्यांचे प्रश्न महासंघ सोडवतो. भविष्यात या महासंघाचे कार्य एकजुटीने पुढे घेऊन जाण्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी महासंघामध्ये सामील व्हावे. एकजुटीने कार्य करून महासंघास पुढे न्यावे, असे आवाहन श्री. राऊत यांनी कर्मचाऱ्यांना केले. खोब्रागडे, नारनवरे, गायकवाड, मेश्राम यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

राज्यातील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधा. शासनाने डॉ. आंबेडकरांच्या वास्तव्य असलेल्या ४१ ठिकाणाच्या संवर्धनासाठी सुमारे ३९ कोटी रूपये निधी उपलब्ध करून दिला. या निधीसाठी पाठपुरावा करण्यामध्ये महासंघाचा मोलाचा वाटा आहे, याचे समाधान असल्याचे इंगळे म्हणाले. प्रस्ताविक महासंघाचे राज्य महासचिव सुरेश तांबे यांनी केले. सूत्रसंचालन विभूतीचंद्र गजभिये यांनी केले. आभार राज्य सरचिटणीस नरेंद्र धनविजय यांनी मानले. अधिवेशनास राज्यातील विविध जिल्ह्यातील 30 प्रमुख संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.

अधिवेशानातील संमत ठराव

जुनी पेन्शन योजना लागू करा. शासकीय कंत्राटी भरती, शाळांचे खासगीकरण करू नये. सर्व विभागांमध्ये नवीन पदभरती, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती करा. शिक्षण विभागातील रिक्त पदे प्राधान्याने भरा, आदी ठराव अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले.

‘शिलेदारां’चा गौरव

महासंघाचे सांगलीतील बाबासाहेब माने, सोलापूरचे जिल्हाध्‌यक्ष अरूण क्षीरसागर, नागपूर शिक्षक संघटनेचे भीमराव सालवणकर, वाहन चालक संघटना, सांगलीचे अध्यक्ष अमजद खान मिरजकर, नागपूरचे विभूतिचंद्र गजभिये यांच्या संघटन कौशल्याची दखल घेऊन त्यांना कास्ट्राईब शिलेदार या पुरस्काराने मान्यवरांच्याहस्ते अधिवेशनात गौरविण्यात आले.

सभासद होण्याचे आवाहन

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत एकत्रित लढा देणारा कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आहे. या महासंघाचे सभासद होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लातूरचे जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे यांनी कर्मचाऱ्यांना केले.

महासंघाचे 43 वे अधिवेशन नागपूरच्या जवाहर विद्यार्थीगृहात पार पडले. अधिवेशनाचे उद्घाटन माजी मंत्री नितीन राऊत यांच्याहस्ते झाले. माजी जिल्हाधिकारी वसंतराव खोब्रागडे, एसआरपीएफ समादेशक प्रियंका नारनवरे, प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, माजी अप्पर आयुक्त सुधीर मेश्राम, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, कार्याध्यक्ष गणेश माडावी,  वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, उपाध्यक्ष प्रभाकर सोनडवले, राजकुमार घोडेस्वार, राज्य शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष बी.डी.धुरंदर उपस्थित होते. महासंघाचे छत्रपती संभाजी नगरचे विभागीय अध्यक्ष मनोज कांबळे, लातूर जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, सरचिटणीस अशोक माळगे, कार्याध्यक्ष गणेश राठोड, कोषाध्यक्ष प्रशांत म्हेत्रे, संघटक नागरत्न कांबळे, शिक्षक संघटनेचे राहुल गायकवाड, सुभाष मस्के प्रसिध्दीप्रमुख बालाजी केंद्रे यांच्यासह महाराष्ट्रातील महासंघाचे विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *