• Fri. Jun 20th, 2025

इयत्ता दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन

Byjantaadmin

Oct 21, 2023

इयत्ता दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन

  • 20 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार

लातूर,  (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या मार्च, 2024 परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. तसेच पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रांन्सफर ऑफ क्रिडेट घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेस्थळावर भरावयाचे असून 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नियमित शुल्कासह हे अर्ज भरता येतील.

माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व आरटीजीएस तथा एनईएफटी पावती, चलनासह विद्यार्थ्याच्या याद्या व प्री-लिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांची अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्यांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. या प्रीलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापक यांनी प्रीलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *