महाराष्ट्र महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन
निलंगा : मिसाईल मॅन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्त ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेस उपयुक्त अशा ग्रंथाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात नामांकित लेखक आणि प्रकाशकांचे ग्रंथ ठेवण्यात आले असून शनिवार पर्यन्त हे प्रदर्शन खुले असेल. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एम एन कोलपुके यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रंथपाल प्रा मीनाक्षी बोंडगे, नॅक समन्वयक डॉ डी एस चौधरी, ग्रंथालय सल्लागार समितीचे सर्व सदस्य डॉ हंसराज भोसले, डॉ अजित मुळजकर, प्रा जी.पी शेंडगे, डॉ विठ्ठल सांडूर, डॉ भास्कर गायकवाड, प्रा श्रीनिवास काकडे, प्रा सचिन शिंदे, प्रा गंगाजी अभिमन्यु, प्रा आत्रम रामदास, डॉ अशोक तुगावे, प्रा दत्ता पवार, प्रा मनीषा वारद, प्रा शिल्पा कांबळे ग्रंथालयीन कर्मचारी तनवीर मनियार, अंजना रंगदळ, माधव शिंदे आणि गणेश वाकळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.