• Sun. Aug 17th, 2025

सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळो यासाठी बनमीसमोर महाआरती पानचिंचोलीत काॅग्रेसचे आनोखे आंदोलन 

Byjantaadmin

Oct 19, 2023
सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळो यासाठी बनमीसमोर महाआरती पानचिंचोलीत काॅग्रेसचे आनोखे आंदोलन
निलंगा: शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार म्हणून सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पन्न दुप्पट तर सोडा उत्पादनासाठी घातलेला खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. आंदोलने, मोर्चे काढूनही सरकारला जाग येत नसल्याने स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारला जाग आणून सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी सद्बुद्धी मिळो या मागणीसाठी सर्व हिंदू शेतकऱ्यांच्या वतीने काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पानचिंचोली येथे सोयाबीनच्या बनमीसमोर कलश पूजा मांडून विधीवत पुजा करुन महाआरती करण्यात आली.
            यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस कमी झाल्याने आणि पिक फुलोऱ्यात असताना मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन उत्पन्नात मोठी घट झाली. एरव्ही एकरी दहा क्विंटल निघणारे सोयाबीन दोन तीन क्विंटलच निघत आहे. जवळपास २२ ते २५ हजार रुपये एकरी उत्पादन खर्च शेतकऱ्यांना घालावा लागत आहे. आणि त्या मानाने उत्पादनही निघताना दिसून येत नाही. त्यातच केंद्र आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. नवीन सोयाबीन बाजारात येताच ५  हजारावरून ४२०० रुपये दर खाली घसरल्याने शेतात घातलेले पैसेही निघत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने व मोर्चे काढले परंतु त्याचा कोणताही परीणाम सरकारवर झाला नसल्याने काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट सोयाबीन बनमीसमोर पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचा फोटो लावून आम्ही हिंदू शेतकरी आडचणीत आहोत आम्हच्या सोयाबीनला दर वाढवून द्यावा अशी सद्बुद्धी ईश्वर आपणास देओ मनत विधीवत पुजा करुन महाआरती करण्यात आली. यावेळी बोलताना अभय साळुंके म्हणाले सन २०२१ ला सोयाबीनचे दर हे आठ हजार रुपये झाले होते. मात्र काही कुक्कुटपालन व्यवसायीक डिओसीचा दर वाढला म्हणून पंतप्रधानांना भेटले. लागलीच ब्राझील सोबत करार करुन २० लाख मेट्रिक टन डिओसी आयात करण्यात आली तेव्हापासूनच सोयाबीनचे दर ढासाळले. त्यात कमी म्हणून की काय परवाच पाम तेल आयात करण्यात आल्याने देशातील आणखीन दर खाली जाऊन ते आज चार हजाराच्या घरात पोंहचले आहेत. शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने चार महिन्यांला दोन हजार रुपये न देता सोयाबीनला आठ ते दहा हजार रुपये दर द्यावा आम्ही शेतकरी सरकारला दोन हजार रुपये देऊ असे मनत देशातील ७० टक्के शेतकरी हे हिंदू आहेत. हे सरकार स्वतः ला हिंदुत्ववादी सरकार समजत मग आम्ही पण हिंदू आहोत मग आमच्यावर का? अन्याय केला जातोय असा प्रश्न साळुंके यांनी उपस्थित केला.
     यावेळी सुधाकर पाटील, ॲड.नारायणराव सोमवंशी,गंगाधर चव्हाण, दिनकर पाटील
विठ्ठल पाटील, प्रमोद मरूरे, बालाजी भुरे,
श्रीकात साळुंके, मदन बिरादार, मुजीब सौदागर ,भगवान पाटील , बब्रुवान जाधव , दिलीप पाटील , भगवान भांगे , साहेबराव पाटील, काकासाहेब पाटील , दिनकर गवळी, नागु जगदाळे, बालाजी काळे , माधव दिवे , उमाकांत कुलकर्णी, मधुकर दिवे , दस्तगीर सय्यद , पाशु सय्यद , मुस्तफा पटेल, ज्ञानोबा  धाबळे , ज्ञानबा जाधव ,जलील शेख,शुभम जाधव, सिद्धू जाधव, अर्जुन कदम, बालाजी बिराजदार, दीपक दिवे, गुरुनाथ जाधव, दिलीप काळे, पिंटू काळे अदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *