• Fri. Jun 20th, 2025

लातूरला पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- आमदार संभाजी पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Oct 19, 2023

यंदा पाऊस अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण लातूर जिल्ह्यात जलसाक्षरता रॅली काढली होती. त्याद्वारे पाणी वापराबाबत जनजागृती करण्यात आली. लातूर जिल्ह्याला शेती आणि उद्योगांसाठी पाणी मिळावे, अशी मागणी सरकार दरबारी केली आहे. याबाबत सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. सरकार आपले असले तरी पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला

विधानसभा निवडणूक आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, यंदा पाऊस अत्यंत कमी झाला आहे. त्यावळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर nilanga  तालुक्यात विविध गावांत विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पणाचा धडाका सुरू आहे. या वेळी मुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.गणेशोत्सवाच्या काळात जलसाक्षरता रॅलीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याला शेतीसाठी व उद्योगांसाठी पाणी कसे मिळेल, यासाठी सरकार दरबारी मागणी केली आहे. त्याबाबत सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.

सरकार आपले असले तरी जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही; तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. पण पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही आमदार संभाजीराव पाटील निलंगेक यांनी केले. सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.विकासनिधीच्या कारणावरूनही आमदार निलंगेकर यांनी राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंगा विधानसभा मतदारसंघात जाणूनबुजून निधी देण्यात आला नाही. आता राज्यात महायुतीचे सरकार आहे. हे सरकार निलंग्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार उषाकिरण शृंगारे, महावितरणचे शिवशंकर सावळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता बोरफळे, कुमोद लोभे, दगडू सोळुंके, शेषेराव ममाळे, गुंडेराव जाधव आदी उपस्थित होते.

पुलाच्या दुरुस्तीसाठी ७५ लाख मंजूर

दोन तालुक्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर बाकली-बसपूर मांजरा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीसाठी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन आमदार निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.पुलाचा भाग खचला आहे. दोन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने येथे मोठी वर्दळ असते, त्यामुळे या पुलाच्या कामासाठी ७५ लाख रुपये निधी आमदार निलंगेकर यांनी मंजूर करवून घेतला. त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *