महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा निवड
मुंबई:-महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. या निवडी करिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी विशेष सहाय्य केले. या नियुक्ती करिता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्तिशः श्रेष्ठीच्या निदर्शनास आणून या करिता पाठपुरावा करून नियुक्ती साठी प्रयत्न केले.
मागच्या वेळेस राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात खाद्यतेल व डाळी यांच्या बाजारभाव मधे वाढीकरिता आयात निर्यात धोरण मध्ये आवश्यक बदल करण्याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयुष गोयल, तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा निवड
