• Sat. Jun 21st, 2025

निलंग्याची कन्या जर्मनीला…अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भव्य सत्कार

Byjantaadmin

Oct 18, 2023

निलंगाच्या कन्या जर्मनीला…अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भव्य सत्कार

निलंगा:- निलंगा तालुक्यातील होसुर गावची कन्या पूजा पांडुरंग बिराजदार ही उच्च शिक्षण घेऊन मास्टर ऑफ ही पदवी घेण्यासाठी युनिक विद्यापीठ जर्मनी येथे जात असतानाच्या निमित्ताने आज निलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सत्कार मूर्ती म्हणून पूजा बिराजदार यांनी आपले लहानपणापासून ते आजतागायत शिक्षणाबदल आपले मनोगत व्यक्त केले.तर अशोकराव पाटील म्हणाले की,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही या शहरामध्ये तालुक्यातील शिक्षणाची परीस्थिती लक्षात घेऊन या शहरामध्ये शिक्षणाचे दार खुले करून सामान्य गोरगरीब व मागास विद्यार्थ्यांना पुण्या- मुंबईला न जाता निलंग्यातच शिकावे म्हणून शिक्षणातील सर्व विभाग व महाविद्यालये स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी काढले.याचाच भाग म्हणून आज पूजा बिराजदार आपले दहावीपर्यंतचे शिक्षण निलंग्यात घेउन निलंगा शिक्षणाचा अटकेपार झेंडा साता समुद्रापलीकडे नेला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणाले.
यावेळी अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँगेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,अल्पसंख्यांक चे तालुकाध्यक्ष लाला पटेल,निलंगा शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे,निलंगा काँग्रेस कमिटीचे सचिव महेश चिकराळे,जिल्हा काँग्रेस कमिटी मा.सेलचे उपाध्यक्ष गोविंद सुर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर,युवक काँग्रेसचे सोहेल शेख,वंचित आघाडीचे उपाध्यक्ष देवदत्त सुर्यवंशी तसेच पूजा बिराजदार यांची आई शिवकन्या बिराजदार,बंधू प्रसाद बिराजदार,काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत अशोकराव पाटील निलंगेकर कट्टर समर्थक तथा पूजा बिराजदार यांचे वडील पांडुरंग बिराजदार होसुरकर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *