• Sat. Jun 21st, 2025

महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवारांना टाळले; अमित शाह असणार प्रमुख पाहुणे!

Byjantaadmin

Oct 16, 2023

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या ४ ते ९ नोव्हेंबरला पुणे येथे होत आहे. मात्र, या स्पर्धांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असतील. शरद पवार यांना मात्र भाजपच्या गटाने या स्पर्धेसाठी टाळल्याने तो चर्चेचा विषय ठरला.गेली अनेक वर्षे कुस्तीच्या खेळाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे राहिले आहे. मात्र, यंदा त्यातदेखील भाजपने सवता सुभा निर्माण केला आहे. त्यामुळे यंदा पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे असणार आहे. कुस्तीच्या पारंपरिक संघटनेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी गेली अनेक वर्षे शरद पवार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेत अनेक चांगले बदल झाले, नव्या संधी निर्माण झाल्या. मात्र, भारतीय जनता पक्षाने येथेही सवता सुभा निर्माण करीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ही स्वतंत्र संघटना निर्माण केली आहे. भाजपचे नेते रामदास तडस हे त्याचे अध्यक्ष आहेत.

Amit Shah failed to protect Delhi from communal riots': NCP chief Sharad  Pawar on Jahangirpur violence

 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या संघामध्ये नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून ॲड. विशाल बलकवडे यांची निवड करण्यात आली आहे. या संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पुणे येथे वाघोली लोणीकंदजवळ फुलगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. त्याची घोषणा आज करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *