• Sat. Jun 21st, 2025

रेणा साखर कारखान्याकडून सभासदाना दसरा/ दिवाळी निमित्ताने सवलतीच्या दरात साखर

Byjantaadmin

Oct 16, 2023
रेणा साखर कारखान्याकडून सभासदाना दसरा/ दिवाळी निमित्ताने सवलतीच्या दरात साखर
लातूर दि. १६.  राज्यात नावलौकिक असलेल्या कमी कालावधीत उभारणी व सर्वाधिक भाव देणाऱ्या दिलीप नगर निवाडा तालुका रेणापूर येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दसरा दिवाळी सणाच्या निमित्ताने सभासदांना व कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येत असून राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक  तथा  सहकार महर्षि दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धीरज विलासराव  देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे प्रती वर्षाप्रमाणे दसरा व दीपावली सणानिमित्त प्रति सभासदांस ५० किलो साखर प्रति किलो २५ रुपये प्रमाणे सवलतीच्या दरात देण्यात येत असून दि. १८ ते २६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये सकाळी ९.०० ते ५.३० यावेळेत आठवड्यातील सुट्टीचे दिवस सोडून शेतकी विभागाच्या गट कार्यालयाच्या ठिकाणी साखर वाटप करण्यात येणार आहे.
तरी सर्व सभासदांनी दसरा दिवाळी निमित्ताने या सवलत योजनेचा लाभ घेवून कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरेउपाध्यक्ष अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी व्ही मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *