विलास साखर कारखाना युनीट – २ यशस्वीतेत सर्वांचे मोठे योगदान -चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
नवरात्रोत्सव घटस्थापना दिनी बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न्
लातूर प्रतिनिधी- विलासराव देशमुख यांचे उदगीर आणि परीसरातील विकासात नेहमी लक्ष राहीले आहे. त्यांच्या पूढाकारातून विलास सहकारी साखर कारखाना युनीट – २
या भागात कार्यान्वित झाला, आज हा कारखाना यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, यामध्ये सर्वांचे मोठे योगदान आहे असे प्रतीपादन चेअरमन वैशाली विलासराव
देशमुख यांनी बोलतांला केले. विलास सहकारी साखर कारखाना युनीट – २, तोडार ता. उदगीर येथील कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम यशस्वीतेसाठी आणि नवरात्रोत्सव घटस्थापना निमित्ताने शुभेच्छा दिल्या. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख हे लातूर जिल्हयातील उदगीरसह जळकोट, चाकूर, शिरुर ताजबंद व अहमदपुर येथील ऊस गाळपासाठी आणि शेतकरी ऊस उत्पादकांच्या प्रगतीसाठी तोंडार येथील विलास साखर कारखाना युनीट – २ कडे नेहमी लक्ष देत आहेत. या कारखान्याचे रवीवार दि. १५ आक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगाम सन २०२३-२४ चे बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सव हा शक्ती उपासनेचा उत्सव आहे. शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापना केली जाते, कलश स्थापनेचे विशेष महत्त्व मानले जाते. कलश स्थापनेचा अर्थ असा आहे की त्या दिवशी आपण देवी दुर्गा मातेच्या प्रकाशस्वरूपाची पूजा करण्यासाठी घटस्थापना करतात. या दिवशी बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी पूढे बोलतांना वैशाली विलासराव देशमुख म्हणाल्या, विलास साखर कारखाना युनीट – २ गळीत हंगाम यशस्वीपणे होत आहेत. येथील ऊस उत्पादकांच्या ऊसाचे वेळेवर गाळप होत असून त्यांना चांगला ऊसदर मिळत आहे. हा कारखाना यशस्वापणे वाटचाल करीत आहे, यामध्ये सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्व घटकांचे महत्वाचे योगदान आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, मन्मथअप्पा किडे, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारूती पांडे, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, उषा कांबळे, विलास साखर युनीट २ चे कार्यकारी संचालक ए. आर. पवार, कारखान्याचे संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ
सवासे, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सूडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, निमंत्रीत संचालक सर्वश्री ज्ञानोबा गोडभरले, पंडीत ढगे, विजय निटूरे, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, प्रिती भोसले आदी उपस्थित होते.
विलास साखर कारखाना युनीट – २ चा गत हंगाम विक्रमी गाळपाचा ठरला आहे. या गळीत हंगामात ४ लाख १६ हजार मे. टन ऊसाचे गाळप झाले असून ४ लाख ८२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले तर साखर ऊतारा ११.५८ इतका आहे. या हंगामात गाळप क्षमतेचा १०१.५० टक्के वापर करण्यात आला. येत्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून या गळीत हंगामा करीता आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणेचे व हार्वेस्टरचे करार पुर्ण करण्यात आले आहेत. कारखाना हंगाम पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने कारखाना मेन्टेनन्स कामे झाली आहेत, त्याच बरोबर कारखाना आसवनी प्रकल्प नोव्हेबर महीन्यापासून कार्यान्वीत होईल, अशी माहिती कार्यकारी संचालक ए.आर.पवार
यांनी बोलतांना दिली. सुरू होत असलेल्या गळीत हंगामाची पूर्ण तयारी झाली आहे. हा हंगाम जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी अधिकात अधिक ऊस मिळवून गळीत हंगाम पूर्ण क्षमेतने पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागतील, असे व्हा. चेअरमन रविंद्र काळे यांनी या प्रसंगी सांगितले. बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी राजेश्वर निटूरे, कल्याण पाटील, मन्मथआप्पा किडे यांनी गळीत हंगाम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी कारखाना स्थळी सर्व संचालक मंडळ, खाते प्रमुख, विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत कामांचा आढावा घेतला. आसवनी प्रकल्पाचे काम अंतीम टप्पयात असून या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून माहीती घेतली. प्रारंभी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमाची महापूजा संचालक अनंत बारबोले व सौ. सुरेखा बोरबोले उभयतांच्या आणि सर्व संचालकांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल इंगळे पाटील यांनी तर आभार संचालक अनंत बारबोले यांनी मानले.