मुंबई : राज्यभरात(ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईत 70 मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
ईडीने जळगाव, mumbai , ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.
राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणि आहे. इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. ED ने jalgaon , नाशिक आणि ठाणे येथील राजमल लखीचंद समूहाच्या 13 ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत गुन्हेगारी कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने/सराफा आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले.