शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांना जयंतीनिमित्त रक्तदानाने अभिवादन
लातूर:- शेर-ए-हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार,दिनांक १८ नोव्हेंबर२०२२ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लातूर शहर मनपा प्रभाग १३ चे विभाग प्रमुख समद अल्लाउद्दीन शेख, उपविभाग प्रमुख अमर बागवान,उपविभाग प्रमुख खंडू गव्हाणे, तसेच शेख साब कंपनीचे शहबाज शेख,अल्ताफ शेख,सद्दाम शेख यांच्या पुढाकाराने रक्तदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
खांडगाव रोड,लातूर येथे आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना महानगर प्रमुख विष्णुपंत साठे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना व्यापारी आघाडीचे जिल्हा समन्वयक तथा बँक कर्मचारी सेना महासंघ जिल्हा प्रमुख सी.के.मुरळीकर, शिवसेना व्यापारी आघाडी जिल्हा उपप्रमुख एस.आर.चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी रक्तदान शिबीर आयोजकांचा मुरळीकर यांच्यातर्फे शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान केलेल्या साब शेख व साठ रक्तदात्यांना संजीवनी ब्लड बँक यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संजीवनी ब्लड बँकेचे महिला कर्मचारी व अधिकार्यांचे चव्हाण व मुरळीकर यांनी पुष्प देऊन स्वागत केले.यावेळेस कबीर शेख,राज शेख,फिरोज कुरेशी,दीपक होनमाने,अनिकेत इंगळे,अख्तार शेख,इक्बाल बागवान,शहाजान शेख,शफिक शेख,खाजा उस्मान, चॉंद शेख,सुनील ढवळे इत्यादी उपस्थित होते.
शेर-ए-हिंद टिपू सुलतान यांना जयंतीनिमित्त रक्तदानाने अभिवादन
