मराठा आरक्षण मागणीसाठी विराट सभा त्यादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा
निलंगा:-दि.१४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी ता. अंबड .जि. जालना. येथे सकल मराठा समाजाची मराठा आरक्षण मागणीसाठी विराट सभा आयोजित केली असून त्यादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे, या निवेदनात म्हंटले आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी ऐतिहासिक अशी मराठ्यांची विराट सभा आयोजित केली आहे, या सभेला महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव अंतरवली सराटी येथे उपस्थित राहणार आहे, महाराष्ट्रातील शासकीय मराठा नौकरदार, कर्मचारी (उदा. प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर व अन्य) मराठा बांधव बहुसंख्येने येणार असून त्यांना उपस्थित राहता यावे यासाठी लातूर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सकल मराठा समाज निलंगा तर्फे करण्यात आली आहे.