वाणिज्य विषयातील पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेला उदंड प्रतिसाद
निलंगाः येथिल महाराष्ट्र महाविद्यालयातील वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि स्पर्धा यशस्वी केली. या कार्यक्रमासाठी दयानंद वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख डॅा. मनीषा अष्टेकर या परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॅा. धनंजय जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॅा. ज्ञानेश्वर चौधरी व सहसमन्वयक डॅा. नरेश पिनमकर हे उपस्थित होते. या स्पर्धेत बॅंकिंग, शेयरबाजार, मानव संसाधन व्यवस्थापन व वाणिज्याशी संबंधित इतर विषयातील पोस्टरने सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेत कु. रोहिणी पेठकर ही प्रथम आली तर कु. आश्विनी क्षीरसागर द्वितीय तर मुल्ला सादिक तृतीय आला. कु. क्रांती जाधव व कु. क्रांती माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. संदीप सुर्यवंशी, प्रा. शिल्पा कांबळे, प्रा. अक्षय पानकुरे व प्रा. वैभव सुर्यवंशी यांनी प्रयत्न केले. तर सिद्धेश्वर कुंभार व गणेश वाकळे यांनी तांत्रिक सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल प्राचार्य डॅा. माधव कोलपूके व संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर यांनी समाधान व्यक्त केले.