• Fri. May 2nd, 2025

धक्कादायक… नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचं थैमान सुरूच, ६ नवजात बालकांसह १५ जणांचा मृत्यू

Byjantaadmin

Oct 8, 2023

नांदेड : विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय विद्यालय-रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच आहे. मागील आठवड्यात एकूण ८३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात तब्बल ३७ नवजात बालकांचा समावेश आहे. गत २४ तासात रुग्णालयात ६ नवजात बालकांसह १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील ७ दिवसापासून नवजात बालकांच्या मृत्यूचं सत्र सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.१ ऑक्टोबर रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ जणांचा झाला होता. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश होता. एकाच दिवशी २४ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर शासकीय मनुष्यबळाची कमतरता आणि औषधाच्या तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर आला. आरोग्य यंत्रणेवरही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अशातच सलग सातव्या दिवशी पण मृत्यूचं प्रमाण सुरूच आहे. धक्कादायक म्हणजे मागील ७ दिवसात अत्यवस्थ असलेल्या ३७ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. १ ऑक्टोबर रोजी १२ नवजात बालकं, २ ऑक्टोबर रोजी ४ नवजात बालकं, ३ ऑक्टोबर रोजी २ नवजात बालकं, ४ ऑक्टोबर रोजी ५ अर्भक, ५ ऑक्टोबर रोजी ४ अर्भक, ६ ऑक्टोबर रोजी १ नवजात बालक तसेच आज ७ ऑक्टोबर रोजी ६ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.नवजात बालकांचे दररोज होत असलेले मृत्यू ही चिंतेची बाब बनली आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असली तरी शासन आणि प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

Nanded Government Hospital 6 newlyborn baby death in last 24 hours

 

युवासेनेचे आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सोमवारी रुग्णालयाला भेट भेणार

दरम्यान, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूच्या थैमानाने राज्यात खबबळ उडाली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट आढावा घेतला. त्यातच उद्या सोमवारी युवा सेनेचेप्रमुख आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे रुग्णालयाला भेट देणार आहेत. आढावा घेतल्यानंतर रुग्णालयातील रिक्त पदाबाबत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे हे नांदेड सोबतच छत्रपती संभाजी नगरच्या शासकीय रुग्णालयात भेट देणार असल्याची माहिती आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *