हासोरी च्या भूकंप प्रतिबंधक उपाययोजनेसाठी आ. अभिमन्यू पवार यांचा मदत व पुनर्वसनमंत्र्याना फोन
मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांचा शेडचे प्रस्ताव सादर करण्याच्या प्रशासनाला सूचना
निलंगा / प्रतिनिधी:- औसा विधानसभा मतदारसंघातील हासोरी बु. व हासोरी खु. येथे पुन्हा भूकंपाचे गूढ धक्के जाणवल्याने भीतीच्या वातावरण वावरत असलेल्या येथील ग्रामस्थांशी (दि. ६) रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी संवाद साधला. या दोन्ही गावांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरूपातील टेंट मंजूर झाले असले तरी ग्रामस्थांनी टेंटऐवजी शेड उभारावे अशी मागणी केली. यासंदर्भात तिथूनच आ. अभिमन्यू पवार यांनराज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांच्याशी संवाद साधला यावेळी मंत्रीमहोद्याने सदरील बाबींचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
या परिसरात वानरांची संख्या अधिक असल्याने त्या दृष्टीने टेंट सुरक्षित नाहीत. त्यामुळे आम्हाला निवारा म्हणून पत्र्याचे शेड देण्यात यावे हि ग्रामस्थांची मागणी असून माही या मागणीस सहमत आहे. गतवर्षी झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरूपातील टेंट उभारणीस ३ कोटी ५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांची मागणी शेडची आहे. यासाठी आणखी १० कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी यावेळी फोनवरून बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. यावर याबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार ग्रामस्थांशी बोलताना सांगितले की याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले. तसेच तहसीलदार यांना २ दिवसांमध्ये शेडचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.२०२२ च्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये औसा विधानसभा मतदारसंघातील हासोरी बु. व हासोरी खु. (ता. निलंगा) या गावांमध्ये जाणवत असलेल्यासततच्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे या दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तसेच तत्कालीन प्रधान सचिव यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे हासोरी बु. व हासोरी खु. येथे भूकंपाच्या अनुषंगाने तात्पुरते निवारे (टेंट) उभारण्यासाठी ३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.