महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी येथे नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी स्वागत समारंभ
निलंगा(प्रतिनिधी):-येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे बी फार्मसी प्रथम, एम फार्मसी प्रथम व बी फार्मसी द्वितीय वर्षात नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ नागोबा सर,(Dean MIT Medical कॉलेज लातूर) यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यायाचे प्राचार्य डॉ एस एस पाटील सर यांनी विद्यार्थ्याना येत्या शैक्षणिक वर्षात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहीती दिली. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर NAAC Co Ordinator प्रा डॉ चंद्रवदन पांचाळ सर व IQAC Co Ordinator प्रा डॉ शरद उसनाळे सर व प्रा सुनिल गरड सर उपस्थित होतेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रवी मोरे सर व प्रा डॉ संतोष कुंभार सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा सुनिल गरड सर यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.