• Wed. Apr 30th, 2025

आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन

Byjantaadmin

Oct 7, 2023
आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन
मुंबई – (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर) मार्च २०२३ मध्ये प्रथमच संपन्न झालेल्या महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत पहिल्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे आता “राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्यांचे (वर्ष दुसरे)” आयोजन करण्यात आलेले आहे.  या लघुपट सोहळ्यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरील कुठल्याही भाषेचे लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना “इंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक असणार आहे.  लघुपटासाठीचा कालावधी जास्तीत जास्त ३० मिनिटांचा असावा. या लघुपट सोहळ्यामध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ असून यांत सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना रोख पारितोषिके व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. शिवाय इतरही वैयक्तिक रोख पारितोषिके आणि सन्मान प्रदान केले जाणार असून सहभागी सर्वच लघुपटांना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. लघुपट निर्मात्यांनी आपले लघुपट हे  २०१६ ते २०२३ ह्या कालावधी अंतर्गत चित्रित झालेले असावेत. लघुपट सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीकरता आर्यारवी एंटरटेनमेंटचे आयोजक श्री. महेश्वर तेटांबे (संपर्क – 9082293867), श्री. अनंत सुतार (संपर्क 8879296636), आणि श्री. मनिष व्हटकर (संपर्क – 99699 20828) यांच्याकडे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *