• Tue. Apr 29th, 2025

रेणापूरच्या शेतकरी आंदोलकांना मुंबई मंत्रालयात अटक

Byjantaadmin

Oct 4, 2023
रेणापूरच्या शेतकरी आंदोलकांमुंबई मंत्रालयात अटक
मंत्रालय आवारात काँग्रेस नेते वड्डेटीना वारांनी स्वीकारले निवेदन
लातूर – मराठवाड्यात नदीजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यात यावा, या व शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर ते मुंबई मंत्रालय पायी संघर्ष यात्रा काढण्यात आली.  मुंबई येथील मंत्रालयात आज 3 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांना  मंत्रालयालयावर मोर्चाचा इशारा दिला होतो. त्यामुळे किसान सेनेचे गजानन बोळंगे व 20 ते 25 आंदोलक शेतकरी मंत्रालयात गेले असता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान विरोधी पक्षाचे काँग्रेस नेते विजय वडेट्ीवार यांनी या आंदोलकांची भूमिका समजावून घेतली व त्यांचे निवेदन स्विकारले.
ताब्यात घेंतलेल्या गजानन बोळंगे, बाबुराव बडे, व्यंकट बोळंगे,  गुरुनाथ बोळंगे ,अच्युतराव करमुडे , कोंडीबा नागरगोजे, राजू नागरगोजे, संतराम चिकटे, प्रमोद चिकटे, गोविंद आवळे, संजय गवरे, पांडुरंग केंचे, ईलाई शेख, गणेश खेडकर, सचिन निकम, बसवेश्‍वर थोंटे, सुरेंद्र भारती, अशोक आगरकर, बळीराम काळे यांना काही वेळानंतर आझाद मैदानावर उपोषणस्थळी आणून सोडण्यात आले.
तीन ऑक्टोंबर मंत्रालयावर मोर्चा जो इशारा दिला होता किसान सेना व शेतकरी यांनी आज आम्हाला मंत्रालयातून अटक करण्यात आली व त्यानंतर सुखरूप सुटका करून आझाद मैदान येथे उपोषणाठिकाणावर  सोडण्यात आले. यामध्ये गजानन बोळंगे बाबुराव बडे व्यंकट बोळंगे, गुरुनाथ बोळंगे अच्युतराव करमुडे कोंडीबा नागरगोजे राजू नागरगोजे संतराम चिकटे प्रमोद चिकटे , गोविंद आवळे संजय गवर,े पांडुरंग केंचे, ईलाई शेख, गणेश खेडकर,  सचिन निकम , बसवेश्‍वर थोंटे,  सुरेंद्र भारती अशोक आगरकर, बळीराम काळे आदी शेतकरी आंदोलकांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed