अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या जाऊ शाखेचे दिमाखदार सोहळा संपन्न
निलंगा- निलंगा मतदारसंघामध्ये सामाजिक बांधिलकी प्रस्थापित करण्यासाठी नव्या तरुण मित्रांना एकत्र करून 80% समाजकारण व 20% राजकारण ही संकल्पना हाती घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री.अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते मित्रमंडळाच्या जाऊ शाखेचे उदघाटन अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,अल्पसंख्याक चे तालुकाध्यक्ष लाला पटेल,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सोनाजी कदम,लहुजी शक्ती सेनेचे कार्यध्यक्ष गोविंद सुर्यवंशी,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बापूंनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला तर लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान’चा नारा दिला.
परंतु आताचे सरकार हे जातिवादी व हिंसावादी सरकार आहे.या सरकारला सत्तेपासून दूर करण्यासाठी आता गांधीजींच्या विचार घेऊन परीवर्तन करण्यासाठी मित्रमंडळाची स्थापना करीत आहोत.यासाठी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’व स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचे जनविकासाचे विचार घेऊन आपणाला एकसंघ होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.तसेच यावेळी मित्र मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी गावातील जेष्ठ नेते समद पटेल,चेअरमन अल्लाबक्स मुल्ला,सरपंच सोहेल शेख,युवक काँग्रेसचे सोशलमीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर,,सोहेल शेख,सजन पटेल,एजाज पठाण,उस्मान उमर शेख,मुबारक मुल्ला,मुजीब पटेल,अशोक कांबळे,इस्माईल शेख, व गावातील युवक,जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थिती होते.