• Tue. Apr 29th, 2025

नमस्ते फाउंडेशन तर्फे गिरगाव चौपाटीची साफसफाई मोहीम

Byjantaadmin

Oct 2, 2023
नमस्ते फाउंडेशन तर्फे गिरगाव चौपाटीची साफसफाई मोहीम. .. !
मुंबई,गिरगाव (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) नमस्ते फाउंडेशन गेली दहा वर्षे सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असुन या संस्थेने आपल्या कालखंडात बरीच मोलाची कामगिरी बजावली आहे. दरवर्षी पाच ते सहा दिवसीय गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर घनकचरा आणि गणपती अवशेष इतरस्त्र पडून त्याची विटंबना होते आणि ही विटंबना होऊ नये यासाठी नमस्ते फाउंडेशन दरवर्षी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास यांच्या सहकार्याने आपल्या कार्यकर्त्यासह स्वच्छता मोहीम आखून गिरगाव चौपाटी पुर्ण साफ करून आपली नैतिक जबाबदारी बजावीत असते संस्थेच्या या कार्याला हातभार लागावा म्हणुन संस्थेच्या कार्यकर्त्यांसह कमीत कमी ५ ते ७ कॉलेजची मुलं आणि इतर ४० ते ५० मुलं सफाईकाम करायला असतात. नमस्ते फाउंडेशनच्या या कार्याचे मुंबई स्तरावर कौतुक केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed