तब्बल दोन ट्रक तंबाखूजन्य पदार्थ घेऊन बल्लारपूरकडे येणा-ऱ्यांवर नागपूर व अमरावतीच्या अन्न औषधी विभागाच्या दक्षता पथकाने विसापूर टोल नाक्याजवळ कारवाई केली. यात तब्बल एक कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील दक्षता अधिकारी कारवाई करीत असताना स्थानिक विभागाला याची माहिती नसावी, याबाबत आश्चर्य आणि शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणी चौघांवर बल्लारपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल १९ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील टोल नाक्यावरून दोन ट्रक माल घेऊन जात होते.
nagpur व amravati अन्न औषधी विभागाच्या दक्षता पथकाला तंबाखूजन्य पदार्थांच्या मोठ्या साठ्याची वाहतूक होत असल्याही माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी बल्लारपूर पोलिसांच्या मदतीने विसापूर टोल नाक्यावर तपासणी करण्याची मोहीम राबविली. या वेळी मध्य प्रदेशकडे जाणा-या दोन ट्रकची तपासणी केली असता, अधिकारीही अचंबित झाले.
कारण या दोन्ही ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू होती. ही तंबाखू जप्त करण्यात आली व या प्रकरणी वाहनचालकांसह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली. या तंबाखूजन्य पदार्थांची किंमत जवळपास एक कोटी अकरा लाख रुपये एवढी आहे. या कार्यवाहीनंतर बल्लारपूरpolice सदर प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध मालाची तस्करी होत असताना स्थानिक दक्षता विभागाला याची माहिती नसावी, याबाबत आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणात दोन चालक व दोन क्लीनरला अटक करण्यात आली आहे. मात्र, हा माल नेमका कुणाचा तो कुठे पोहोचवायचा होता. या सगळ्या बाबींचा तपास सुरू करण्यात आला आहे.. राज्यात २०१२ पासून तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे; पण या कामात तस्करांचे मोठे जाळे पसरलेले आहे. बल्लारपूर चंद्रपुरात तंबाखूची तस्करी करणारे मोठे म्होरके आहेत.स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. सदर माल हा कर्नाटक राज्यातील बिदर येथून मध्य प्रदेश राज्यात जाणार होता. या प्रकरणाचा तपास बल्लारपूरचे ठाणेदार उमेश पाटील करत आहेत. ही कार्यवाही अन्न औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात दक्षता विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे, सहआयुक्त समाधान पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.