• Tue. Apr 29th, 2025

लायन्स क्लबच्या “आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

Byjantaadmin

Sep 20, 2023

लायन्स क्लबच्या “आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण  .

५० आदर्श शिक्षकांचा गौरव

latur  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त व लायन्स परिवारला सेवेचे ५०वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने.लायन्स परिवाराच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षा निमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य करणाऱ्या ५० शिक्षकांचा “लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने”सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल मा खा.डॉ. गोपाळराव पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश देवसटवार.माजी प्रांतपाल डॉ. मन्मथ भातांब्रे हे उपस्थित होते या वेळी व्यासपीठावर लायन्स क्लब लातूरचे अध्यक्ष प्रा. अशोक पांचाळ.लायन्स क्लब लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष तुकाराम पाटील , लायन्स क्लब लातूर सिटीचे अध्यक्ष डॉ.धर्मवीर भारती.झोन चेअर पर्सन मंजुषा कुर्डुकर आदी मान्यवरांची यावेळी  व्यासपीठावर उपस्थिती होती .या वेळी सौ. मालती गिरी,सौ.राजश्री भारती,सौ.शीतल गड्डिमे,सौ.मनीषा काथवटे,सौ.अलका पुरी,श्री.राहुल बावा,सौ.वीणा गोसावी,श्री.दयानंद भारती,सौ.मनीषा पुरी,सौ.प्रभावती स्वामी,सौ.अनुराधा बेळंबे,श्री.ओमकार पाटील,श्री.नाना शिंदे,सौ.रूपा शिरशिकर,सौ.अर्चना मालू,श्री.बाळासाहेब यादव,श्री.अमोल पगार,श्री.प्रकाश रोडिया,श्री.विवेक सौताडेकर,श्री.तुकाराम येमले,श्री.रामकिशन कराड,श्री. शहुराज सूर्यवंशी,सौ.अर्चना तळेकर,श्री.कपिल नरवडे,श्री.दिलीप शिंदे,श्री.चंद्रकांत पांचाळ,सौ.मीनाक्षी जाधव,श्री.माधव कोलपुके,सौ. महानंदा भातांब्रे,सौ.मीनाक्षी भारती,सौ.वसुधा झुकले,सौ.सुरेखा येनगे,प्रा.सुधाकर तोडकर,प्रा.एकनाथ पाटील,सौ.कोमल गोमारे,श्री.सिद्धेश्वर बेल्लाळे,प्रा.शशिकांत.स्वामी,श्री.विशाल वर्मा,सौ.अनुजा. जाधव,श्री.अभिजित यादव,श्री.लक्ष्मीकांत बुगदे,श्री.प्रदीप कुलकर्णी,श्री.भास्कर सोळुंके,श्री.सहदेव माने,श्री.शिवाजी हेंडगे आदी शिक्षकांना लायन्स आदर्श शिक्षक २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांनी या पुरस्काराला उत्तर ही दिले.व्यासपीठावरील मान्यवरांनी या वेळी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अशोक पांचाळ यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल पुरी व सूदाम पवार यांनी केले.या पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed