मांजरा परीवाराप्रमाने उसाला भाव मिळेल त्यासाठी आधुनिकतेची कास धरा
मारुती महाराज साखर कारखान्याची गाडी आता रुळावर अशीच रुळावर राहू द्या
सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आवाहन
औसा तालुक्यांतील मातोळा सोसायटी व बँकेच्या प्रशस्त शाखेचा शुभारंभ
औसा-औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाचा भाव मांजरा परिवारातील कारखान्याप्रमाणे पाहिजे असेल तर ऊसाची देखभाल तशी झाली पाहिजे . कारखान्याची मशिनरी आधुनिकीकरण झालेले पाहिजे व व्यवस्थापन ही तसे हवे .मागील काळात काय झाले याचा पाठिशी अनुभव घेवून मारुती महाराज साखर कारखाना मांजरा परिवारातील अन्य कारखान्या प्रमाणे मारुती महाराज सुद्धा पुढे गेला पाहिजे यासाठी कारखाना आता चांगल्या ट्रॅक वर आला आहे तो ट्रॅक वरच राहू द्या ट्रॕक वरुन पुन्हा गेला तर आपल्याला मदतीला आता कोणीच येणार नाही याची काळजी घ्या व आगामी काळात मांजरा परिवारासोबत आपण रहा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले ते औसा तालुक्यातील मातोळा येथील सोसायटीच्या इमारत व जिल्हा बँकेच्या प्रशस्त अध्यावत शाखेचा उदघाटन सोहळा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला त्यावेळी दिलीपराव देशमुख बोलत होते .
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री देशमुख म्हणाले की लातूर जिल्ह्यातील शेतक-यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून काही चांगले करता येईल का ? शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी साखर कारखाने , जिल्हा बँक , सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करता आले आहे .या भागातील शेतकरी व कार्यकर्त्यानी आज केलेले स्वागत व षुष्पवृष्टी पाहून आपण भारावून गेलो असून या स्वागताची उतराई करण्यासाठी येथील कार्यकर्ते व शेतक-यासाठी आगामी काळात निश्चितपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले ..शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांनी मारुती महाराज साखर कारखान्याची सुरुवात शासकीय भांगभांडवल देऊन केली आहे ..केवळ शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून या कारखान्याची उभारणी झाली आहे असे सांगून लातूर जिल्हा बँकेमुळे शेतकरी व साखर कारखाने उभे राहिले आहेत आता कारखान्याची गाडी रुळावर आली आहे , ही रुळावरच राहू द्यावी असे आवाहन केले आहे .
जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी-बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख यांची माहिती
यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की लोकनेते विलासराव देशमुख, ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर , माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर , शिवाजीराव नाडे या सर्व मंडळीनी या भागात अथक परिश्रम करुन विकासाची प्रक्रिया चालू ठेवली हेच काम आता सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख लोकनेते विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चार दशकापासून अविरतपणे लातूर जिल्हा बँक राज्यात नावारूपाला आली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्हा मध्यवर्ती बँक खंबीरपणे उभे आहे
आगामी काळात शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्यासाठी बँकेचा प्रयत्न
पाच लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज तुती लागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून कर्ज तसेच मुलीच्या लग्नासाठी कन्यादान योजना पाल्याच्या उच्चशिक्षणासाठी कर्ज स्वरूपामध्ये आर्थिक मदत अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बँक समर्थपणे कार्य करीत आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी केले जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून काम करीत असताना सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अनुभवाचा आणि सर्व संचालक व अधिकारी कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आगामी काळात शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याने लातूर जिल्हा बँकेला सहकार क्षेत्रातील आतापर्यंत देशपातळीवरील 27 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कर्ज देत असताना फक्त शेतकरी असणे आणि महत्त्वाच्या थोडक्यात कागदपत्रावर जिल्हा बँक कोणत्याही राजकीय भेदभाव करीत नसल्याचे सांगून सहकार क्षेत्रामधील एक आदर्श बँक म्हणून नावारूपाला येत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असेही धीरज देशमुख यावेळी म्हणाले.
यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक मातोळा संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भोसले यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ प महेश महाराज, महंत राजेंद्रगिरी महाराज, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, बँकेच्या संचालिका स्वंयप्रभा पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे उदगीर बाजार समितीचे उपसभापती प्रीती भोसले,औसा बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भोसले, बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, उदयसिंह देशमुख, रामदास चव्हान, बँकेचे सन्माननीय संचालक मंडळ, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक मंडळ मांजरा साखर कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमास मातोळा येथील सरपंच आशा गोविंद भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब भोसले, सहाय्यक निबंधक अशोक कदम, सोसायटीचे चेअरमन व्यंकट भोसले, व्हॉईस चेअरमन गणेश भोसले उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीती भोसले, धनंजय भोसले, सयाजी दारफळकर, अजित भोसले, व्यंकट मोरे, विक्रम भोसले, मुकुंद भोसले, दत्ता सूर्यवंशी, गजानन माळी, वत्सलाबाई भोसले, वर्षा आनंदगावकर, सिंधू गायकवाड यांच्यासह मातोळा ,लोहटा, वांगजी, देवताळा, तावशी परिसरातील शेतकरी सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोविड नंतर पहिल्याच कार्यक्रमात मोठी …
मातोळा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व जिल्हा बँकेच्या अत्याधुनिक प्रशस्त शाखेचा शुभारंभ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व आमदार धीरज देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास मोठया प्रमाणात गर्दी झाली होती मोठया प्रमाणावर सभासद शेतकऱ्यांनी हजेरी लावल्याने आगामी काळात होणाऱ्या मारुती महाराज साखर कारखान्याची निवडणुकीची रंगीत तालीम असल्याची चर्चा लोकांत सूरू होती त्याला स्वरूप पण तसेच दिसत होते कारण मागच्या 5 वर्षापूर्वी मांजरा साखर परिवाराने जो शब्द दिला होता तो त्यांनी तंतोतंत पाळला आज कारखाना चांगल्या ट्रॅक वर आला आहे हाच ट्रंक ठेवावा लागेल तर अधिकपणे आपल्याला पुढें जाता येईल त्यामुळें आगामी निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे माजी मंत्री दिलीपराव देशमुख व आमदार धीरज देशमुख यांनी अतिशय दिलखुलास वास्तव्य चित्र त्यावर बोलले लोकांची मने त्यांनी जिंकली टाळ्यांचा गजर झाला ..