• Wed. Apr 30th, 2025

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण

Byjantaadmin

Sep 15, 2023

औरंगाबाद, (विमाका) :-  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त रविवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.सकाळी 8.45 वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करणे, परेडच्या पोलीस प्लाटूनकडून शोक सलामी, स्मृतीस्तंभास पुष्पचक्र, पोलीस बँड पथकाकडून हुतात्म्यांना मानवंदना असे कार्यक्रम ध्वजारोहणापूर्वी होणार आहेत.ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे निमंत्रीतांची भेट घेतील व चित्रप्रदर्शनास भेट देणार आहेत. अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.ज्या शासकीय तसेच निमशासकीय आस्थापनांना आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम करावयाचा असेल त्यांनी असा कार्यक्रम मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदर किंवा अर्धा तास नंतर करावा, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed