• Fri. May 2nd, 2025

उमरगा हा येथे मराठा  आरक्षणासाठी बेमुदत उपोषण  

Byjantaadmin

Sep 12, 2023
मौजे उमरगा हा येथे मराठा  आरक्षणासाठी बेमुदत उपोषण
निलंगा  प्रतिनिधी -मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोंज जरांगे पाटील यांनी अतंरवाली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत त्यांच्या आंदोलनाला पांठीबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रभर गावोगावी उपोषण सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून निलंगा तालुक्यातील  उमरगा हा येथील मा तंटामुक्त अध्यक्ष माधव सोपान लोभे व मा सरपंच अमोल बिराजदार  हे  तरुण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून दि 12.9.2023.पासून उमरगा हा येथील मुख्ये चौकात  उपोषणाला बसले आहेत  मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण करत आहेत यांची  राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे  जर का शासनाने दाखल घेतली नाही तर सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने  हे आंदोलन तिव्र करण्यात येईल असा इशारा उपोषण करते अमोल बिराजदार माधव सोपान लोभे यांनी दिले आहेत यावेळी गावचे नागरिक दिनकरराव लोभे विलास लोभे कुमोद लोभे हिरालाल लोभे अजित लोभे  श्रीधर लोभे राजीव लोभे युवराज रणखांब आदित्ये लोभे नामदेव लोभे राजाराम लोभे भास्कर लोभे संजय रणखांब यांनी उपोषणास सहभागी होऊन जाहीर पाठींबा असल्याचे सांगितले  उमरगा हा गावात कुणबी जातीचे तिन कुटुंबाच्या नोंदी  सापडले आहेत यांच नोंदी ग्राहाये धरून सर्वच मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे शासनाने . मराठा आणि कुणबी एकच आसल्याचे 1956 पुर्वीचे  शेकडो पुरावे लातूर जिल्ह्यात  व तालुक्यात  सापडले आहेत  तेव्हा ताबडतोब सरसकट मराठा समाजास ओबीसी आरक्षण घोषीत करावे व महाराष्ट्रातील उपोषणाला बसलेल्या हजारो  आंदोलकांचे प्राण वाचवावेत   अन्यथा हि परिस्थिती अत्यंत गंभीर होईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *