• Wed. May 7th, 2025

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवीवर्षानिमित्त  ‘मराठवाडा मॅरेथॉन लातूर 2023’चे आयोजन

Byjantaadmin

Sep 11, 2023

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवीवर्षानिमित्त  ‘मराठवाडा मॅरेथॉन लातूर 2023’चे आयोजन

  • जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
  • बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘क्रीडा महोत्सव’

लातूर,  (जिमाका): मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजता मराठवाडा मॅरेथॉन लातूर 2023चे आयोजन करण्यात आले आहे. बार्शी रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातून या मॅरेथॉनला प्रारंभ होईल.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगण येथून पीव्हीआर चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर मॅरेथॉनचा समारोप होणार आहे. तरी या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त खेळाडू, युवक-युवती, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा क्रीडा संकुल येथे बुधवारी होणार ‘क्रीडा महोत्सव 2023’

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे बुधवार, 13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ‘क्रीडा महोत्सव 2023’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटनल हॉलमध्ये हा महोत्सव होईल. या कार्यक्रमात जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी, नागरीक व खेळाडूंनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्र (भ्रमणध्वनी क्र. 9975576600) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे लातूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *