राज्य व केंद्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी
लातूरात उपोषणस्थळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट
लातूर (प्रतिनिधी) सोमवार दि. ११ सप्टेंबर २०२३: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लातूर येथील तहसील कार्यालयानजीक आदित्य देशमुख यांनी उपोषण सुरू केले आहे, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. ११ सप्टेंबर
२०२३ रोजी सकाळी १० वाजता सहकाऱ्यांसह उपोषण स्थळी भेट देऊन, उपोषणकत्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून संबंधीत यंत्रणांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासंबंधी सूचना केल्या. काँग्रेस पक्ष आणि आपण व्यक्तिशः मराठा समाजासोबत असून समाजाच्या सर्व मागण्यांना व त्यासाठी सुरू असलेला आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचेही यावेळी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. तसेच राज्य व केंद्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी अशी
मागणी योवळी त्यांनी केली. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता लातूर तहसील कार्यालया जवळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्ते आदित्य देशमुख यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मराठा समाज बांधव सहकारी व सबंधित यंत्रणांनी अदित्य देशमुख यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, अशी विनंती आमदार देशमुख यांनी केली.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, अप्पासाहेब देशमुख, राम काळे, आकाश एंजिले, लातूर शहर जिल्हा काँग्रेस सचिव अविनाश बटटेवार,लातूर मराठा क्रांती मोर्चाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.