सेटल बॅडमिंटन तालुकास्तरीय स्पर्धेत जय भारत विद्यालयाचा संघ प्रथम
निलंगा/प्रतिनिधी निलंगा येथील क्रिडा संकुल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय १६ ते १७ वयोगटातील सेटल बॅडमिंटन स्पर्धेत जय भारत विद्यालयाच्या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला असून या स्पर्धेतील खेळाडू सतिश सुर्यवंशी,मंगेश पिटले,सुमित पवार,राखीव खेळाडू अमर वांजरवाडे यांचा सहभाग होता.या स्पर्धेत तालुक्यातील विविध सहा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.शहरातील सेंट मेरी विद्यालय द्वीतीय तर महाराष्ट्र विद्यालयाने या सेटल बॕडमिंटन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
जय भारत विद्यालयाचे क्रिडा शिक्षक सुनिल तारे,सुनिल शिंदे,प्रशिक्षक गौरव पांचाळ यानी विजयी खेळाडूंना मार्गदर्शन केले असून जय भारत विद्यालयाचे अध्यक्ष वसंतराव पाटील मुख्याध्यापक राजेश पाटील व शाळेतील शिक्षकांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.